कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना मुंबई विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विषयात पी .एच .डी पदवी प्राप्त झाली आहे .
शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन,उल्हासनगर या महाविद्यालयामार्फत ‘अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्याप्रती विशेष शिक्षक आणि सामान्य शिक्षकांचा दृष्टीकोन आणि अभिरूचीचा तुलनात्मक अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. डॉ. बिना एस. खेमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते मीना शेंडकर मॅडम यांचा करण्यात आला . या वेळेला उपशिक्षणाधिकारी एस के . यादव ,जिल्हा परिषद अधीक्षक उदय सरनाईक , सचिन माळी , सागर काटकर या अधिकारी वर्गासह संघटनेचे राज्यसचिव शिवाजी भोसले ,विभागीय अध्यक्ष महादेव डावरे ,पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे ,शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,कार्याध्यक्ष गोरख वातकर ,कुमार पाटील ,सागर राणे , बाळासाहेब मोकाशी, महिला पदाधिकारी छाया हिरुगडे ,विद्या पाटील हे उपस्थित होते .
-----------------------------------------------



