"भावा लग्न करतोस काय ?" जोडी छान दिसते ; नेटकऱ्यांच्या कमेंट चा पाऊस ; रिंकू राजगुरू उर्फ आर्ची आणि कृष्णराज महाडिक ने घेतले महालक्ष्मीचे दर्शन ; तसे काही नाही हो...फक्त दर्शन घेतले...कृष्णराज महाडिकांची प्रतिक्रिया

Kolhapur news
By -

 

              


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा. त्यासोबतच एक कॅप्शनही कृष्णराज महाडिक यांनी दिलं आहे. "आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं.", असं कॅप्शन कृष्णराज महाडिक यांनी फोटो शेअर करताना दिलं आहे. हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात येत आहे. 


नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अशातच कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूनं करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडीकही होते. दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, दोघांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. फोटोवर रिंकू आणि कृष्णराज दोघांचेही चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

"भावा लग्न करतोस काय ?" जोडी छान दिसते.असा नेटकऱ्यांच्या कमेंट चा पाऊसच पडत  असल्यामुळे 

   तसे काही नाही हो...फक्त दर्शन घेतले...अशी  कृष्णराज महाडिकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे .


    --------------------------------------------------


"