कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सर्वसामान्य पार्श्वभूमी असतानाही कष्ट, सचोटी आणि जिद्दीच्या जोरावर यशाची नवी क्षितिजे गाठणारे अजयसिंह व्ही. देसाई यांनी कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गुणवत्तेवर ठाम विश्वास ठेवून सुरू केलेला बांधकाम व्यावसायामधील त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून आधुनिकतेशी मेळ घालत शहरामध्ये त्यांनी दिमाखात उभारलेली एलिक्झा पार्कची वास्तू शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
कोल्हापूर शहरात बांधकाम व्यवसायामध्ये नवा आयाम निर्माण करणा-या ‘एलिक्झा पार्क’ या अजयसिंह व्ही. देसाई यांच्या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज आणि विठ्ठलराव देसाई यांच्या हस्ते तसेच डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील साहेब आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्याला माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयंतराव आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, संजयबाबा घाटगे, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, उद्योगपती विनोद घोडावत, सतिश घाटगे, मोहन घाटगे, क्रीडाईचे अध्यक्ष, के. पी. खोत क्रीडाईचे महाराष्ट्र सचिव विद्यानंद बेडेकर, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, संजयसिंह व्ही. देसाई, विजयसिंह व्ही. देसाई, डॉ. संजय एस. पाटील, गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
-------------------------------------------



