नानीबाई चिखलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरास दोन लॅपटॉप भेट

Kolhapur news
By -

 

          

                 



कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       नानीबाई चिखली येथील पंचशील नगर मधील भूमिपुत्र व प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर सध्या अमेरिका देशात स्थायिक झालेले प्रसिद्ध उद्योगपती आयु. जॉन बापू कारले व त्यांच्या पत्नी आयु. एलिझाबेथ जॉन कारले या दांपत्याने आज रविवार दिनांक 16/02/2025 रोजी सकाळी 9.00 वाजता "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला" विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी , तसेच त्यांना संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावे मुलांना अध्ययन अध्यापनामध्ये अधिक माहिती देता यावी यासाठी विद्यालयाला दोन नवीन लॅपटॉप भेट दिले . 


    तसेच भविष्यातसुद्धा शाळेच्या विविध उपक्रमांना अजून भरपूर देणगी देणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी शाळा बचाव समिती व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ विद्यालयात उपस्थित  होते.


------------------------------------------------------


    आयु.जॉन कारले कुटुंबीयांची सेवाभावी वृत्ती...


  आयु.जॉन कारले परदेशात तरी स्थायिक झाले असले तरी ज्या गावात लहानाचे मोठे झालो तेथील समाजाची गावची परिस्थिती याची पूर्ण जाण त्यांना आहे. 

आजपर्यंत शैक्षणिक सामाजिक उपक्रमांबरोबरच गोरगरीब लोकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी गोरगरीबांना करोडो रुपयांची मदत केली आहे. 

गावच्या हायस्कूलला वर्गखोली बांधून देण्याबरोबरच गावच्या प्राथमिक शाळांना अंगणवाड्यांना रंगकाम करून बोलकी शाळा बनवण्यामध्ये योगदान दिले असून त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या सुख दुःखाच्या प्रसंगी सुद्धा हजारो रुपयांची देणगी या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.


  -----------------------------------------------------