कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील राजराम कारखान्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही .
कारखान्यात एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून, आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,आज सकाळी पावणे अकराच्या च्या सुमारास कारखान्याच्या मिलला आग लागली. यामध्ये तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपला होता. मात्र, या आगीत मोठे नुकसान झाले. राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता असून कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक अध्यक्ष आहेत. राजकीय संघर्षामुळे हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला आहे.
हंगाम संपल्यानंतर कारखान्यातील मशीन्सची साफसफाई करताना आग लागली. कारखान्यात खाली पडलेल्या ऑइलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न करत आग विझवण्यात यश आले आहे.
कारखान्याचा सीजन संपल्यानंतर डिसमेंटिंगच काम चालतं.काम चालू असताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की अचानक पेट धरली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे लक्षात आले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले असुन अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे ,असे कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडीक यांनी सांगितले आहे . या दुर्घटनेत कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसल्याचेही अमल महाडीक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे .
------------------------------------

