कोल्हापूर न्यूज नेटवर्क
देशभर ज्याची चर्चा सुरू आहे ते महाकुंभ स्नान याची देही याची डोळा पहायचे म्हणून निपाणीचे अभय मानवी यांचे सर्व कुटुंब प्रयागराज येथील महाकुंभात दाखल झाले.
महाकुंभ मध्ये माता गंगेच्या थंडगार पाण्यातील डुबकी मुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे मानवी यांनी बोलून दाखवले . नागा साधूंचे दर्शन अद्भुत होते .सनातन धर्माची पताका हजारो वर्षे फडकत ठेवणाऱ्या या साधूंच्या बद्दल भाविकांच्या मनात फार मोठे कुतूहल दिसून आले.ते कोठून येतात व महाकुंभ नंतर कोठे गायब होतात हे सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता भाविकांत दिसून आली.विशेष म्हणजे हजारो परदेशी भक्त सुध्दा दिसून आले.महाशिवरात्री पर्यंत पासष्ट कोटी पर्यंत भाविकांनी महाकुंभला हजेरी लावल्याची गणती ए. आय. तंत्रज्ञानच्या सहाय्याने शक्य झाल्याची माहिती त्यांनी दिली.
निपाणीतील या सधन कुटुंबात यापूर्वी घरची आमदारकी होती , गॅरेज व शेती उद्योगात अनेक प्रयोग करत त्यांनी नाव कमावले. कर्नाटकातील बेळगावचे कांहीं भाविक कुंभ दुर्घटनेत दगावले होते.त्यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा त्यांनी सांत्वन केले होते.महाकुंभ नंतर अयोध्या दर्शन करून हे कुटुंब गावी परतले . 'कोल्हापूर न्यूज नेटवर्क' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, महाकुंभ दर्शन "न भूतो न भविष्यती" असेच होते.
--------------------------------------


