शिवाजी महाराजांचा आशिया खंडातील सर्वात उंच ५१ फुटांचा अश्वारूढ पुतळा ठरतोय शिवप्रेमींचे आकर्षण

Kolhapur news
By -

 

            


     नाशिक: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात तीन एकरांवर शिवसृष्टीची उभारणी सुरू आहे.याशिवाय शिवछत्रपती, छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील साहित्य ग्रंथांसह इतर इतिहास ग्रंथांनी परिपूर्ण असे शिववाचनालय, शिववस्तुसंग्रहालय, एतिहासिक चित्रपट बघण्यासाठी १०० आसनी सिक्स डी थिएटर असेल. मनमाडकडून नांदगाव शहरात प्रवेश करण्यापूर्वीच ही शिवसृष्टी नजरेस पडते. ७१ फूट उंचीचे बेसॉल्ट दगड आणि किल्ल्याच्या धर्तीवर उभारलेले भव्य प्रवेशद्वार, आतमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आशिया खंडातील सर्वात उंच म्हणजे, २० फुटांच्या बेसवर ३१ फुटांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाच या शिवसृष्टीची भव्यता दर्शवून जातो. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पूर्णतः ब्राँझ धातूमध्ये बनवला गेला आहे. धुळ्याच्या सरबत पाटील या कारागिराने पुतळा घडवला आहे.

 

       ऊन, वारा, पाऊस याचा यावर कुठलाही परिणाम होऊ नये याकरिता फायबर मेटलचा यात वापर करण्यात आला आहे.शिवसृष्टीकरिता एकूण ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, सध्या अश्वारूढ पुतळा, शिवाजी महाराजांचा इतिहास भिंतीवर चितारण्याचे काम सुरू आहे. प्रवेशद्वाराचे निम्मे काम असे जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. अजून दीड वर्षात या संपूर्ण शिवसृष्टीचे काम पूर्ण होईल.


        तीन एकरवरील ही भव्य शिवसृष्टी पूर्ण होण्यासाठी अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असला तरी आत्तापासूनच शिवप्रेमींना या शिवसृष्टीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येथील काम सुरू असतानाही येथे शिवप्रेमीची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे.


            ---------------------------------