राष्ट्र भक्तीची प्रेरणा आणि स्वातंत्र्याची स्फूर्ती घरा घरात मना मनात : शिवतीर्थ पुन्हा पुनित झाले

Kolhapur news
By -

 

              

                   

                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        शिवजयंती केवळ उत्सव म्हणून किंवा सण म्हणून साजरी करायची नाही.ज्यांनी आपल्या  प्राणाची बाजी लावून हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि  स्वातंत्र्याची ज्योत मना मनात पेटवली  त्या शिवरायांच्या पासून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांच्या मूर्तींचे मोफत वितरण आज शिवतीर्थावर होत आहे.मूर्ती वितरणाला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादामुळे शिवतीर्थ पुन्हा एकदा पुनित  झाले आहे .असे उद्गार शिवभक्त संकेत भोसले यांनी शिवतीर्थावरील  मूर्ती वितरण समारंभात  काढले.लहान लहान मंडळे  शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती .

  

पायातली वहाणे उतरून आणि पुतळ्याला प्रणाम करून शिवतीर्थावर प्रवेश केला जातो.अबाल वृद्ध शिवप्रेमी तर नित्यनेमाने दर्शन घेतातच पण बाजाराला येणाऱ्या बाया बापड्या सुध्दा भक्तिभावाने हात जोडतात.शिवराय म्हणजे स्फुर्तीचा तेजःपुंज पोत आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुहास खराडे यांनी केले.

   

  या उपक्रमातून ते घरा घरात आणि मना मनातही  पोहचतील असा विश्वास अन्य कांहीं शिवभक्तांनी व्यक्त केला.सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार ,जगदीश गुरव,प्रकाश परिश्र्वाड,तानाजी भराडे ,संकेत शहा या बिनीच्या शिवभक्तांनी या अफलातून समारंभाचे आयोजन केले होते.


  मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वळंजू , माजी नगरसेवक सुनील रणवरे, प्रा.चंद्रकांत जाधव,अभियंता बाळासाहेब सूर्यवंशी , प्रा.संभाजी अंगज,विजय सापळे,आकाश पाटील. (निढोरी) इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.





        --------------------------------------