महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नासंदर्भात केले चार ठराव

Kolhapur news
By -

 

            

                      

                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीने सीमा प्रश्नासंदर्भात, मराठा मंडळ निपाणी येथे आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक अच्युत माने सर यांच्या अध्यक्षतेखाली सीमा प्रश्नाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये खालील ठराव एकमताने करण्यात आले . 

 

ठराव क्रमांक : -  १) महाराष्ट्रात नव्याने महायुतीचे सरकार मोठ्या जनादेशाने सत्तेवर आलेले आहे. या सरकारने आता सीमा प्रश्नासंदर्भात निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता समन्वय असल्याने सीमावासीयांना न्याय देणे शक्य आहे. त्या दृष्टीने आगामी विधानसभा अधिवेशनात सर्वपक्षीयांनी मिळून सीमाप्रश्नी ठराव करावा व केंद्राकडे पाठपुरावा करावा.

            

        ठराव क्रमांक : -२ ) सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याला काही काल मर्यादा निश्चित नाही. इतकी वर्ष न्याय न मिळणे हा सीमावासीयांवर अन्यायच आहे. केंद्राने यात आता हस्तक्षेप करावा. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे महाराष्ट्राची बाजू मांडणार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने पूर्ण सहकार्य करावे.

 

          ठराव क्रमांक :-३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. सर्व साहित्यिक, रसिकांनी जे उपस्थित राहतील त्यांनी सीमा प्रश्ना संदर्भात मराठी भाषिकांना न्याय मिळावा यासाठी या अधिवेशनात ठराव संमत करावा.


      ठराव क्रमांक :- ४) सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासीय नेत्यांचे शिष्टमंडळ, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधित्वासह माननीय पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांची प्रत्यक्ष चर्चेसाठी बैठक बोलवावी , तसा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी करावा व चर्चेची तारीख निश्चित करावी.


या बैठकीस बाळासाहेब सूर्यवंशी ,जयराम मिरजकर, कबीर वराळे ,तुकाराम कोळी ,बाबासाहेब खांबे ,प्रा एन आय खोत , संतराम जगदाळे , लक्ष्मीकांत पाटील ,अशोक खांडेकर ,विजय काशीद ,आनंदा रणदिवे ,उदय शिंदे , राजकुमार मेस्त्री ,संतराम जगदाळे,प्रताप पाटील,रमेश निकम,आनंदा बेलवळे , विनायक साळवी,विजय पाटील,सौरभ बेलवळे , रमेश कुभांर ,दिलीप जाधव,विशाल घोडके ,अतुल शिंदे ,गणेश घोडके ,सुर्याजी पोटले,प्रकाश रावण, ए.डी.पाटील, शिवाजी पाटील,विशाल पाटील,धनाजी निर्मळे ,सुधाकर माने,बाबासाहेब मगदूम ,किरण पाटोळे,उदय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


 --------------------------------------------