मा.एकनाथरावजी शिंदे यांचे ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन .

Kolhapur news
By -

 

       


                   



                

                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    मा.एकनाथ राव शिंदे साहेब .आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. तरीही मागील अडीच वर्षातील आपली मुख्यमंत्री ही प्रतिमा अजूनही पुसता पुसेना.


    विधानसभेत महायुतीचा जो झंझावात आला तो तुमच्या मुळेच.

    देवाभाऊ आणि दादा यांच्याहुन हटके अशी प्रतिमा तुम्हीं निर्माण केली होती.


    किती किस्से सांगावेत .


उध्दव आणि आदित्य तुमच्यावर  तुटून पडले होते.


"पन्नास खोके,गद्दार,मिंधे , घटना बाह्य सरकार,मर्दासारखे मैदानात या,निवडणुका घेऊन दाखवा."

   

 निर्धाराच्या ढालीवर ही शस्त्रे बोथट करून टाकलीत.


     हिमालयात ध्यानाला बसलेला दाढीधारी ऋषी बर्फ,वादळ वारा ,पाऊस यांची कधीच पर्वा करत नाही.योग साधनेत खंड पडू देत नाही.


    आपण सुध्दा 'कर्म योगी' बनून जनसेवेची अखंड साधना करत आहात.


    कोरोना काळात मास्क बांधून घरी बसला नाहीत.श्वास कोंडलेल्या हजारो रुग्णांचे तुम्हीं जणु 'ऑक्सीजन' बनलात.


 आपले गुरू आनंद दिघे यांच्याकडून आपण लोकसेवेचे व्रत घेतले.त्यांच्यावरील दृढ निष्ठेपायी त्यांच्यासारखीच दाढी राखली. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पायाला भिंगरी बाधून. महाराष्ट्रभर फिरलात.


     रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात दरडी कोसळल्या .पन्नास घरांचे गाव . त्यातील सतरा घरे गाडली गेली. हेल्मेट घालून मध्यान रात्रीला आपण डोंगर चढलात . यमदुतांशी दोन हात केलेले .


बघता बघता एकनाथचे लोकनाथ झालात.


      पुढे निवडणुका साद घालू लागल्या .लाडक्या बहिणीसाठी मैदानात उतरला .हा हा म्हणता भावाला एवढे प्रेम बहिणींनी दिले की त्यांच्या राख्या मनगटापासून खांद्यापर्यंत पोचल्या.


   हे नातं इतकं दृढ झाले की  एकनाथ भैय्या  हजारो बहिणींचा  जणू  '१ नाथ ' झाला.


    ' ऐकनाथ ' म्हणून खिजवणाऱ्या तत्कालीन विरोधकांना सभागृहातच मिश्किल भाषेत उत्तर देऊन चूप केलेत.


     मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून तुम्हीं नाराज झालात .मंदिरात देवीसमोर ध्यान लाऊन बसलात.तुमच्या अंतर्मनात देवी पुटपुटली असेल.

"एकनाथ नाराज होऊ नको.मागच्या वेळेला देवा भाऊने तुझ्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता.आता तुझी पाळी आहे.उध्दव सारखा त्रागा करायचा नाही. तुझ्या कपाळावरचा भव्य टिळा हा चित्रपट भक्ती आणि सेवा यांचे प्रतिक आहे.साऱ्या महाराष्ट्राने त्याला सलाम केला आहे.


  तीन चाकी रिक्षाने तुझ्या लोकसेवेची सुरुवात झाली आहे.महायुतीचे सरकार  सुध्दा तीनचाकी गाडाच आहे.तो ओढायला तुझी ताकद लागणार आहे . दिल्लीतल्या एन डी ए सरकारला सुध्दा एका बाजूने धनुष्याचा टेकू द्यायचा आहे.पद नव्हे तर 'राष्ट्र प्रथम' हे  ब्रीद जपायचे आहे.


  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी सत्तेतल्या पदाची कधीच अपेक्षा केली नव्हती.तुमचे गुरू आनंद दिघे यांनी पण नाही.

   

     दीर्घायुषी भव 

           तथास्तु ."


    ------------------------------------------