उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? संजय राऊत यांचे संकेत

Kolhapur news
By -

 

           


           मुंबई :शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. 


दिल्लीत आपचा मोठा पराभव झाला आहे. आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने हा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते कश्मीर नेते उमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर अजून भांडत बसा असा टोमणा काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना लगावला आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देखील इंडिया आघाडीच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली असे संजय राऊत म्हणाले.


         -----------------------------------------