नवी दिल्ली : मराठी भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे महान कार्य केले आहे. मराठीने आपल्याला अनेक दलित साहित्यिक पण दिले. मराठी साहित्यात विज्ञान कथा देखील आहेत. महाराष्ट्राने किती प्रगती केली ,आपली मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाची राजधानी म्हणून वर आली. मुंबई म्हटले की चित्रपटांचा विषय येतो. याच मुंबईने हिंदी चित्रपटांना देखील स्थान दिले. आज तर छावा चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. याची सुरुवात देखील मराठी लेखक शिवाजी सावंत यांनीच केले आहे.
राजधानी दिल्लीत आजपासून ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून आणि देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार, असे मोदी यांनी मराठीमध्ये म्हंटले. आज दिल्लीच्या धर्तीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषेपूर्ते मर्यादित नाही. संत तुकरमांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते.
देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाचे शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळी देखील म्हणून दाखवल्या. मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवीन नवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
ते पुढे म्हणाले, मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौन्दर्य आहे संवेदना आहे, समानता आहे समरसता पण आहे, अध्यात्माचे स्वर पण आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्ती पण आहे युक्ती पण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा सारख्या वीर मराठ्यांनी शत्रूना मजबूर केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. केसरी आणि मराठा सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याचे काम केले.
-------------------------------------------

