लहान मुलांना ढसाढसा रडताना पाहिलं तेव्हा समाधान वाटले -मरकंद अनासपुरे

Kolhapur news
By -

 

              


  मुंबई : “सध्या महाराष्ट्रात जातीय वातावरण कलुषित करण्याचं जे काम होतंय, त्यामध्ये छावा सिनेमा निश्चितच एक उत्तम मलमाचं काम करेल, याची मला खात्री आहे. आपला हा इतिहास जपला पाहिजे आणि सोबतच हा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मध्यंतरी कोल्हापूरच्या संभाजी छत्रपतींनी जी सूचना केली फार महत्त्वाची वाटली. महाराष्ट्रातील जे मातब्बर इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासपूर्ण एक शिवचरित्र लिहावं आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे इतिहासाची जी मोडतोड होते किंवा त्याविषयी हलक्या दर्जाची विधानं करण्याची सवय मोडीत निघेल, अशी अपेक्षा आहे. मी खासकरून हा चित्रपट पाहिल्यावर लहान मुलांना ढसाढसा रडताना पाहिलं तेव्हा समाधान वाटले की, कशाप्रकारे आपला इतिहास हा जाज्वल्यपणे आपल्यासमोर येतो आहे. सिनेमा म्हणून याचा व्यवसाय किती होईल हे महत्त्वाचे नाही परंतु या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”


 छावा चित्रपट मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी कुटुंबाबरोबर पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ते  माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते . 


     पुढे ते म्हणाले, ”आपण सजगतेनं, सवंदेनशिलतेनं हा चित्रपट पाहणं, तो समजून घेणं, इतिहासाची मोडतोड न करता, त्याचं विकृतीकरण न करता, त्याविषयी विचित्र भाष्य न करता आपण सर्वांचा अभिमान, आपण धर्मरक्षक संभाजी महाराज म्हणतो, धर्मासाठी ज्यांनी प्राण त्यागले, त्यांचा धगधगता इतिहास या चित्रपटाने मांडला आहे, त्याबद्दल मी दिग्दर्शक उतेकर यांचे अभिनंदन करतो. विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना व सर्व मराठी मातब्बर मंडळींचे मी अभिनंदन करतो.”


           ---------------------------