कागल : तालुक्यातील गोरंबे येथील प्रा. डॉ.श्रद्धा पाटील यांच्या लेखणीतून 'चिंध्याच्या बाहुल्या' ही गावगाड्यातील स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कादंबरी साकारली आहे. या कादंबरीला शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्था, चंद्रपूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरुषप्रधान संस्कृती, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, एकांगी अर्थव्यवस्था आणि यातून स्त्री वर्गाला मिळणारा दुय्यमपणा यावर प्रकाश टाकत समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी कलाकृती त्यांच्या लेखणीतून सत्यात उतरली आहे. यामुळे महिला वर्गाच्या अनेक वर्षांच्या प्रश्नांना वाचा फुटली असून गडहिंग्लजमधील शिवराज महाविद्यालय या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
----------------------------------------

