कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील दौलतवाडीमध्ये येथे एक गवा रेडा विहिरीत पडला .त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे अधिकारी यांनी सलग सात तास प्रयत्न केले. एकदा बाहेर काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा तोच गवा दुसऱ्या एका विहिरीत पडला.त्या विहिरीतून सुध्दा त्याला बाहेर काढला.वनातील ही वैभव पुन्हा वनाकडे सोपवण्यात येणार आहे.
ही चित्तथरारक घटना पहाण्याकरिता बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती.
या घटनेची माहिती घेतली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जगातील प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
बिबटे,वाघ,सिंह व अन्य हिंस्र स्वापदे सुद्धा बिनदिक्कत नागरी वस्त्यांवर व महामार्गावर प्रकट होऊ लागले आहेत.
दौलतवाडी व परिसरातील नागरिकांत हीच जोरदार चर्चा सुरु होती.
गवा रेड्याला बाहेर काढण्यासाठी व सुरक्षित पणे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी खालील अधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुमोल परिश्रम घेतले.
कोल्हापूर बचाव पथकाचे प्रदीप सुतार,अमोल चव्हाण, आशुतोष सुरवाशी, वनरक्षक राहुल जोवळ,(हसूर खुर्द), ए.व्ही. बुरटे वनपाल कापशी, सागर पांढरे, वनरक्षक कापशी, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट इत्यादी.
अशा दुर्घटना टाळणे गरजेचे असून शेतातल्या विहिरी , खणी यांना संरक्षक कठडे असणे आवशक आहेत असा सूर नागरिकांच्या बोलण्यातून दिसून आला.
------------------------------------

