मुंबई :शरद पवार हे मोदींपेक्षाही सिनियर आहेत. सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत. वास्तविक मोदी शरद पवार यांच्या बाजूला बसणार नाहीत असे मला वाटले होते. कारण भटकती आत्म्याच्या बाजूला पीएमओने त्यांना कसे बसू दिले?असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मोदींनी शरद पवार यांना दिलेला मान-सन्मान हा केवळ ढोंगीपणा असल्याचेही ते म्हणाले. त्यांचे केवळ 'देखिल्या देवाला दंडवत' असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील रंगली होती. तर नरेंद्र मोदी शरद पवारांची काळजी घेताना देखील दिसून आले. या सर्वांची चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
------------------------------------------------

