राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात शिष्यांनी केली स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकाची स्वच्छता.

Kolhapur news
By -

 

                

                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती .डोक्यावर गाडगे व हातात झाडू घेऊन त्यांनी आयुष्यभर गावा गावांची स्वच्छता केली.परमेश्वर कोणाला कधीच दिसला नाही.तो दगडात दिसणार नाही,तो मनात अनुभवयाचा असतो अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचा हा संदेश शिरसावंद्य मानून शासनाने सुद्धा  स्वच्छता अभियाना चे आयोजन केले .

     मुरगूड येथील युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारक स्थळाची आज सकाळी स्वच्छता केली.त्यांनी केलेल्या या समाज सेवेला तोड नाही. स्मारक स्थळावर इतका कचरा होता की सकाळी सहा ते दहा पर्यंत हे युवक झाडू घेऊन अक्षरशः धुळीत काम करत होते.

    हे युवक स्व.मंडलिक साहेबांना गुरूस्थानी मानतात. त्यांनी सुद्धा सारे आयुष्य गाडगेबाबांना आदर्श मानून लोकांमधील भ्रम दूर करण्यात घालवले . लोकसेवेत ईश्वर सेवेचे समाधान माना असा संदेश त्यांनी दिला होता.

सध्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सुध्दा त्यांना गुरुस्थानी मानत होते.

   शपथ विधीनंतर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी जाऊन स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले होते.

     त्यांचे शिष्य असलेल्या अनेक युवकांनी आपल्या गुरूंच्या स्मारक स्थळाची आज स्वच्छता केली.स्व.मंडलिक यांचे दहन या स्थळी करण्यात आले होते.शिवराज हायस्कूलच्या प्रांगणात हे स्मारक आहे. स्मारकाच्या स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते असे दिसले. त्याबद्दल या युवकांनी खंत व्यक्त केली.

    

     स्व.मंडलिकांचे स्मारक  सामाजिक कार्यकर्त्यांचे व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थळ म्हणून पहिले जाते.


    सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, तानाजी भराडे, संग्राम डवरी,शिवाजी चौगुले, प्रशांत सिद्धेश्वर, पप्पू कांबळे ,संदीप सावर्डेकर, विनायक मेटकर  या युवकांनी  स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला तसेच स्मशान भूमीची सुद्धा स्वच्छता केली.

        

    



 ------------------------------------------------------