4 जे आर ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन संघटनेच्या मागणीशी यश : रस्त्याचे काम मार्गी लागणार

Kolhapur news
By -


 


   निपाणी : गत काळात 4 जे आर ह्यूमन राईट्स केअर आँरगेनायझेशन संघटने मार्फत आकोळ रोड वरील ए.पी.एम.सी मध्ये अनेक सरकारी ऑफिस आहेत आणि सरकारी ऑफिस असणाऱ्या ठिकाणीच मूलभूत सुविधा म्हणजेच रस्ते नाहीत तर बाकीच्या ठिकाणचे काय आणि या मुळे नागरिकांना,तसेच वाहनांना,पावसाळ्यात येण्यास त्रास होत असून येथे रस्ता बनविण्यात यावी अशी  तक्रार केली होती, त्या संदर्भात चिकोडी सहाय्यक अभियंता चिकोडी यांना  तहसिलदार  निपाणी यांनी या संदर्भात  सूचना दिलेल्या आहेत. 


   APMC परीसर रस्ता कामाचा शुभारंभ झाला ही प्रगतीची बाब आहे. या ठीकाणाचा रस्ता करणे संदर्भात दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या तक्रारीची दखल घेवून निपाणी तालुका  तहसिलदार बाळीगार  यांनी आकोळ रोड वरील APMC आँफीसचे आवारातील रस्ता करण्यासाठी चिकोडीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता लोक निर्माण विभाग यांना संघटनेच्या संदर्भ पत्रासहीत लेखी पत्र दिले होते. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. 


   -----------------------------------