कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे पाडव्याच्या मुहूर्तावर एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल चे उद्घाटन करण्यात करण्यात आले.
न्यू इंग्लिश मिडीयम या येथील एकमेव इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे हे हस्तांतरण आहे.प्रख्यात उद्योजक धोंडीबा मकानदार व त्यांचे पुत्र जावेद मकानदार यांनी शिक्षण क्षेत्रात टाकलेले हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असे म्हणावे लागेल. ऍग्रो इंडस्ट्री व तत्सम उद्योगांचा त्यांचा व्याप महाराष्ट्राच्या सव्वीस जिल्ह्यात पसरला आहे.
ज्ञानदानाच्या क्षेत्रात त्यांनी टाकलेले हे पहिलेच पाऊल आहे . परिसरातील जवळपास 50 खेड्यांमधील ग्रामीण मुले या शाळेत इंग्रजी शिकण्यास उत्सुक आहेत.
सीबीएसई अभ्यासक्रमासह ऑलिंपियाड, नवोदय, स्कॉलरशिप इत्यादी परीक्षांशिवाय क्रीडा क्षेत्रात ही मोठी झेप घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी हॉलीबॉल ,कुस्ती जुदो व ॲथलेटिक्स मधील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नेमले आहेत. या पुराच्या गावात मुला मुलींना पोहता यावे म्हणून एक कोटीच्या स्विमिंग टॅंकचीही त्यांची योजना आहे.
मुरगूड व परिसरातील जवळजवळ ३०० पालकांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले.विद्यार्थी वाहतुकीसाठी महिंद्रा कंपनीच्या तीन नवीन बस गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या जस्मिन जमादार यांनी केले. प्रसिद्ध उद्योजक किशोर पोद्दार यांच्या हस्ते नवीन बसचे पूजन करण्यात आले.
एम जे लकी इंटरनॅशनलचे अध्यक्ष जावेद मकानदार ,माजी पोलीस सब इन्स्पेक्टर पांडुरंग कुडवे ,उद्योजक सुहास खराडे , न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष व्ही आर भोसले, संजय घोडके, सौ भराडे, ऍग्रोचे मॅनेजर सचिन मिसाळ इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले.
कुमारी पिया निकम या विद्यार्थिनीने म्हंटलेल्या ओजस्वी शिवस्तुतीने आणि छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने समारंभाची सुरुवात झाली. प्रमुख उपस्थित नागरिकांमध्ये प्रसिद्ध,,, कापड व्यापारी शहा, नामदेवराव पाटील ,फिरोजखान जमादार ,डॉ. कल्याणकर , प्रा. अमोल राऊत, श्रीमती सुशीला पाटील, सौ. आफ्रिन मकानदार, जुबेदा मकानदार, सौ.एम व्ही भोसले यांचा समावेश होता.
सौ. सारिका जाधव व सौ .दीपा मसवेकर यांनी सूत्रसंचालन केले व श्रीमती ग्लोरीया फर्नांडिस यांनी आभार मानले.
----------------------------------



