बाळूमामांच्या भंडारा उत्सवात मुरगूडच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान.

Kolhapur news
By -

 

              


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     आदमापूर येथील बाळूमामांच्या भंडारा उत्सवात मुरगूडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यात्रेकरूंना टँकरने पाणीपुरवठा करून मोठे योगदान दिले आहे. 


    उन्हाचा तडाखा व  त्यामुळे वाढलेले हवेतील तापमान यामुळे भाविकांना पुन्हा पुन्हा पाण्याची  आवश्यकता भासत होती.

      मंदिरात उपलब्ध असलेली पिण्याच्या पाण्याची  सोय अपुरी पडत  होती . देवस्थानच्या  कार्याध्यक्षा  रागिनी खडके यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुरगूड येतील काही समाजसेवकांना आवाहन करून टॅंकरने शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था होऊ शकेल का ? अशी विचारणा केली. 


    सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट,जगदीश गुरव ,तानाजी भराडे इत्यादींनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाण्याचे काही मोफत टँकर मागवले. श्री बाळूमामा यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या काही भक्तांनी आपल्या स्वतःच्या मालकीचे पाण्याचे टँकर पुरवले.  पुण्यकर्म म्हणून त्यांनी पाणीपुरवठ्याची ही सेवा भाविकांना उपलब्ध करून दिली.

    कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी देवस्थान समितीच्या वतीने या सामाजिक कार्यकर्त्यांना व टँकर मालकांना धन्यवाद दिले. अनेक भाविकांनीही या सेवे बद्दल कार्यकर्त्यांना दुवा दिला.


     -------------------------------------