कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या प्रियांका येरूडकरचा मुरगूड येथे छत्रपती शिवाजी महाराज संकुल च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष वस्ताद आनंद गोधडे हे होते.
छत्रपती शिवाजी महाराज संकुल ने गेल्या चार वर्षात अनेक पैलवान निर्माण केले शिवाय बॉईज भरती साठी सुद्धा युवकांच्या कडून नित्य सराव करून घेतात असे कुस्ती कोच स्वप्नील इंदुरीकर यांचा आम्हांस अभिमान वाटतो असे उद्गार वक्त्यांनी काढले.
प्रियांकाचे वडील माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर ,माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी,विनोद चौगुले ,सिद्धू दिवटे,सर्जेराव हसबे ,अंकुश मांगले,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सूत्र संचालन राजू चव्हाण यांनी केले.पृथ्वीराज कदम यांनी आभार मानले.
---------------------------------------

