कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून काही महिन्यापासून चर्चा सुरू आहे. पण हा प्रवेश लांबणीवर पडला होता . अखेर हा मुहूर्त ठरला असून मंगळवारी दुपारी संजयबाबा मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये संजयबाबा घाटगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता . त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजयबाबांनी आपला पाठिंबा महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर केला, त्या मोबदल्यात त्यांना जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक पद मिळाले. दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होतीच , अखेर उद्या मंगळवारी दुपारी मुंबई येथे त्यांचा प्रवेश त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे यांच्या समवेत होणार आहे . भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल .
-----------------------------------