मुस्काटात मारून पाकला सांगा..."यह नया भारत है.

Kolhapur news
By -

 

 

                  



        कोल्हापूर न्यूज  /  वि. रा.भोसले


     टीव्ही आणि सोशल मीडियावरच नव्हे तर वॉशिंग्टन पोस्ट,न्यूयॉर्क टाइम्स,इत्यादी परदेशी वृत्तपत्रांनी सुद्धा सांगितले आहे की पाकिस्तानने आता आवरावे .भारत महाग पडेल.


      पाकिस्तानला घमेंड आहे की १९४७ प्रमाणे हल्ला करून काश्मिरात घुसू.पाक व्याप्त काश्मीर ही खरं तर नेहरूंची चूक होती.जनरल करिअप्पाना त्यांनी थांबवले व ते युनोत  गेले.

     पाकमधली अपरिपक्व पोरं अजून म्हणतात १९४७ सारखा दणका देऊ.तितक सोपं नाही.


    आता नेतृत्व कणखर आहे.सेना शक्तिमान आहे. सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे तयार आहेत.आम्हीं मुद्दाम कळ काढलीच नाही.सव्वीस निरपराध पर्यटकांना मारले म्हणून आमची ही जबाबी कारवाई आहे.

    २६/११,बालाकोट,अमरनाथ यात्रा.

    किती निष्पाप लोकांना तुम्हीं मारणार ? आणि का ?

    हिम्मत असेल तर सशस्त्र सैन्याबरोबर लढा ना.

    भ्याड हल्ले करून तुम्हीं फक्त तुमची पोटदुखी दाखवत आहात .काश्मीर तुम्हाला कधीही मिळणार नाही उलट पीओके सुद्धा ताब्यात घेऊच घेऊ. 

     1965 ला शास्त्रीजींनी आणि 1971 ला इंदिराजींनी दणका दिला आहे .

आठवते ना ?

    आता मोदीजी आहेत. एकदा त्यांनी तुम्हाला सांगितले आहे .

   "आमचा लढा दहशतवाद्यां विरुद्ध आहे . पाताळात दडले तरी त्यांनासुद्धा शोधून काढू. तरी तुमच्या कुरापती सुरूच आहेत, सर्वसामान्य नागरिकांना लक्ष करून तुम्ही भारतावर विजय मिळवू शकणार नाही".

  आता मुस्काटात मारून तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे की 

   "यह नया भारत है."

हा भारत फक्त लाहोर पर्यंत नव्हे तर रावळपिंडी इस्लामाबाद पर्यंत पोहोचेल. तुमच्या पंतप्रधानाच्या घरात ही घुसेल आणि लपलेल्या लांडग्यांना शोधून काढेल.

   

 येथील मुस्लिम ख्रिश्चन बांधवांसह सर्व समाजबांधव सेनेच्या पाठीशी आहेत ,कारण तुम्ही निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.

     लक्षात ठेवा.चंद्रावर झेंडा लावलेला हा भारत आहे. मंगळावर ही स्वारी करायच्या तयारीत आहे. 

    "यह नया भारत है."

   

       *******************