तलावाचे पाणी स्वच्छ असताना नदीचे गढूळ पाणी कशासाठी ? मुरगूड नागरिकांची विचारणा.

Kolhapur news
By -

 

              


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         सर पिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


  महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व गढूळ पाणी नागरिकांना पुरवून त्यांच्या जीविताशी खेळ का करायचा अशी विचारणा करून तसे लेखी निवेदन नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेला देण्यात आले.मुख्याधिकारी यांनी यावर लगेच प्रतिक्रिया देऊन नदीचे पाणी यापुढे शहराला न देता तलावाचेच पाणी देण्यात येईल असे सांगितले.


  नागरिकांच्या शिष्ठ मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (दादा गट) शहर अध्यक्ष रणजीत सिंह सूर्यवंशी  ,संजय भारमल, आर बी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट,जगदीश गुरव,राहुल घोडके,विनायक भोसले,शिवाजी रावण, रणजीत सावंत,पंकज नेसरीकर,दत्ता हासबे इत्यादींचा समावेश होता.


          ---------------------