कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी
मुंबई येथे मंत्रालयाच्या दालनामध्ये क्रीडामंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव, हातकणंगले व हुपरी येथे क्रीडा संकुल मंजुरीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच क्रीडा संकुल मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा मंत्री महोदयांनी यावेळी दिले, तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्यांक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या बैठकीस राज्याचे क्रीडा सचिव अनिल डीग्गीकर, आयुक्त शितल उगले-तेली, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक माणिक पाटील, उपसचिव सुनिल पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, विशेष कार्य अधिकारी संतोष गावडे,तय्यब कुरेशी,स्विय सहाय्यक सुहास राजमाने यांसह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
----------------------------