डॉ. जब्बार पटेल यांना कोल्हापुरात शाहू पुरस्कार प्रदान

Kolhapur news
By -

 

           


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     राजेशाहीतसुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेकांचा विरोध झुगारून लोकशाही मूल्यांची जपणूक केली. त्यांच्या विचारधारेत भारतीय व पाश्चात्त्य संस्कृतीचा सुरेख संगम दिसतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समतेच्या माध्यमातून शाहूंचे विचार उतरवले. आजचे अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांना माणुसकी आणि शाहूंचे विचार समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.


       'राजर्षी शाहू पुरस्कार २०२५' ज्येष्ठ नाट्य, चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. 


   जिल्हाधिकारी अमोल येडगे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हा  पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., डॉ. अशोक चौसाळकर, रोहित तोंदले, डॉ. जयसिंगराव पवार, मोहिनी चव्हाण, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते. 


          -----------------------