कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मध्ये विविध विकासकामे व्हावीत यासाठी प्रस्तावित विकासकामांच्या यादी सह एक निवेदन शिवसेनेच्या शिंदे गटामार्फत पालक मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले.
जिल्हा विकास मंडळांकडे (DPDC) जी प्रस्तावित कामे आहेत त्यांची यादी सोबत सादर करण्यात आली असून या कामी निधि मंजूर व्हावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रस्तावित कामे याप्रमाणे.वाडेकर मळा ते निपाणी रोड गटर्स,माधवनगर रस्ते व गटारे,जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत रस्ते व गटारे,सर पिराजी गटारे , ,स्मशानभूमी विकसित करणे ,आंबेडकर नगर ते भुते हॉल गटारे अशा२० विविध कामांच्या पूर्ततेसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगुले , किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे इत्यादींचा समावेश होता.
-----------------------