दहा दिवसीय निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू

Kolhapur news
By -

 

        



       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       "शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाईन स्त्रोतांची ओळख करून घेणे काळाची गरज आहे."असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गात ते मार्गदर्शन करत होते.

  

 या दहा दिवशीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण  वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर चे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई,वरिष्ठ अधिव्याख्याता महादेव वांडरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

 

  दररोज सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सुरुवात परिपाठाने होते.प्रशिक्षणार्थी यांच्यातील एका गटाच्यावतीने त्याचे आयोजन केले जाते. प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व अभ्यासक्रम आराखडा परिचय,भारतीय ज्ञानप्रणाली,बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९,मूल्यांची रुजवणूक,शाळा मूल्यांकन,संवाद कौशल्ये विकासाच्या वाटा,शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया,नवीन आव्हाने पेलताना,रजा नियमावली, २१ व्या शतकासाठीची कौशल्ये,शालेय अभिलेखे व शासकीय योजना,शैक्षणिक संशोधन माहिती अधिकार कायदा २००५,मूल्यमापनाच्या विविध पद्धती,सेवा हमी कायदा,नेतृत्व विकास आणि प्रशासन,शालेय स्तरावरील विविध समित्या आदी घटकावर निवड श्रेणी केंद्र समन्वयक प्रा.एस. आर.वावरे (दूधसाखर महाविद्यालय,बिद्री),प्रा. एम.बी.मोहिते (डी.सी. नरके महाविद्यालय, कुडित्रे),प्रा.एम.वाय.साळुंखे (अण्णासाहेब डांगे महाविद्यालय,हातकणंगले) प्रा.एम.डी.पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय,कोल्हापूर) यांनी मार्गदर्शन केले.उत्साही वातावरणात प्रशिक्षण सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू आहे.हे प्रशिक्षण गुरुवार ता.१२ जून पर्यंत आहे.







कोल्हापूर- १) येथील दहा दिवसीय सेवांतर्गत निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई 

२) मार्गदर्शन करताना वरिष्ठ अधिव्याख्याता महादेव वांडरे

३) मार्गदर्शन करताना केंद्र समन्वयक प्रा.एस.आर.वावरे ४)मार्गदर्शन करताना सुलभक प्रा.एम.बी.मोहिते 

५) मार्गदर्शन करताना सुलभक प्रा.एम.वाय.साळुंखे

६) मार्गदर्शन करताना सुलभ प्रा.एम.डी.पाटील


            -------------