खिदमत फाउंडेशन व रहेमान फाउंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार

Kolhapur news
By -

 

       


         कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी


हेरले ( ता. हातकणंगले ) येथे खिदमत फाउंडेशन आणि रहेमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उर्दू शाळामध्ये  शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला तसेच वीणा मोबदला कबर काडणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचे व एमएससीबीच्या  सर्व स्टाफ यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. 


   खिदमत फाउंडेशन यांच्या तरफे उर्दू शाळेमध्ये आंगणवाडी शिक्षिका यांचा एक वर्षाचे पगार देण्यात आला.या प्रसंगी इरफान जमादार,समीर नायकवडी,इरफान कुरणे , जुबेर बारगीर , रसूल खतीब,सलीम खतीब,आरिफ खतीब यांचे या शाळेला बहुमोल सहकार्य लाभल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला.


 या कार्यक्रमास कैस भाई बागवान (उद्याजोक) , हाजी अबुबकर मुल्ला (आध्यक्ष कोल्हापूर शाखा रहेमान फाउंडेशन ), इम्तियाज मैशाळे सर, कमरूद्दिन मुजावर ,  उपसरपंच निलोफर खतीब  , मुनिर जमादार,  टिपू सुलतान खतीब,  ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर , इरफान जमादार , आरिफ खतीब, जुबेर बारगीर ,समीर नायकवडी, इरफान कुरणे , मोहसीन बारगीर, रसूल खतीब,नियाज खतीब , सलीम खतीब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



   हेरले : ऊर्दू शाळेत खिदमत फाउंडेशन व रहेमान फाउंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार करतांना मान्यवर


         -----------------------