कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"वृक्षारोपण,विविध स्पर्धांचे आयोजन,रक्तदान,शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करून माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा वाढदिवस साजरा करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे." असे प्रतिपादन हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात माजीमंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी नगरसेवक दीनानाथ मोरे होते
पर्यवेक्षक प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धा विजेते अनुक्रमे कु.सानिका खोत,कु.आरोही कांबळे, कु.मृणाली कांबळे,कु.श्रावणी जानकर निबंध स्पर्धा विजेते अनुक्रमे कु.सायली शिंदे,कु. प्रतीक्षा खरात,कु.समीक्षा माळी,कु.आरोही कांबळे काव्यवाचन स्पर्धा विजेते अनुक्रमे कु. सानिका खोत,कु.समृद्धी चव्हाण,कु.सायली शिंदे,कु.प्रज्ञा भोसले,कु.खदिजा मुला़णी, पाककृती स्पर्धा विजेते अनुक्रमे कु.क्षितिजा मगदूम,कु.सानिका खोत,कु.प्रज्ञा भोसले,मेंहदी स्पर्धा विजेते अनुक्रमे कु.क्षितिजा कु.प्रणाली येताळे,कु.श्रावणी आवळे,कु.शर्वरी पवार, रांगोळी स्पर्धा विजेते अनुक्रमे कु.समीक्षा पाटील, कु.शर्वरी पवार,कु.सिद्धी परीट,कु.प्रणाली येताळे, विठ्ठलराव मुसाई,नगरसेवक दीनानाथ मोरे यांची भाषणे झाली.दरम्यान रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री.मेमाणे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा.डॉ.एकनाथ पाटील, प्रा.डॉ.आप्पासाहेब शेळके,प्रा.रवींद्र पडवळे, प्रा.सुनीता पाटील,प्रा.मनीष साळुंखे,प्रा.दिनकर पाटील.डॉ.नामदेव खवरे,प्रा.डॉ.अमोल महाजन, प्रा.डॉ.बालाजी कांबळे.डॉ.विजय डोंगरे आदी उपस्थित होते.प्रा.डॉ.मोहन सावंत यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सुहास इनामदार यांनी आभार मानले.
हातकणंगले-येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शरद मेमाणे शेजारी दीनानाथ मोरे,प्रा.डॉ. एकनाथ पाटील,प्रा.रवींद्र पाटील,प्रा.मोहन सावंत
---------------------