विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेकडे 102 कोटीच्या ठेवी, 93 लाखाचा नफा - प्रवीणसिंह पाटील

Kolhapur news
By -

 



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

 

विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँक मुरगूड या बँकेकडे 31 जुलै 2025 अखेर 102 कोटीच्या ठेवी जमा झाल्या असून एकूण व्यवसाय 173 कोटी झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील यांनी दिली .


    31 जुलै अखेर संस्थेकडे 2 कोटी 29 लाखाचे भाग भांडवल जमा असून 7 कोटी 69 लाख एकूण निधी आहे. 71 कोटी ची कर्जे वितरण केली आहेत. एकूण गुंतवणूक 38 कोटी असून बँकेला 93 लाखाचा नफा झाला आहे. निव्वळ एन.पी.ए शून्य टक्के आहे. 

बँकेच्या एकूण 6 शाखा असून बँकेकडे खेळते भाग भांडवल 116 कोटी 63 लाख आहे. अहवाल सालात बँकेला ऑडिट वर्ग *अ* प्राप्त झाला आहे.


  रिझर्व बँकेच्या मान्यतेने 5 लाखां पर्यंतच्या ठेवीस ठेव विमा संरक्षण देण्यात आले आहे. बँकेकडे अद्यावत लाॅकर्स सोय उपलब्ध असून स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ राहिला आहे. सन 2023.. 24 साला ११ टक्के डिव्हिडंट वाटप केला असून बँकेच्या वतीने आरटीजीएस व एन इ एफ टी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बँकेकडून गरीब विद्यार्थ्यांना शाळेलेय उपयोगी साहित्य वितरण केले आहे.


 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बँकेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव शिंदे युवा नेते दिग्विजय पाटील, एकनाथ मांगोरे,गणपतराव लोकरे,सुधीर सावर्डेकर, बी विठ्ठल मेटकर, शिवाजीराव पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगुले,विजय शेट्टी उपस्थित होते.


            --------------------