मुंबई : वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले .
या चर्चेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी सर्व कोल्हापूरकरांचे आभार मानले आहेत.
----------------------------