गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही - जरांगे पाटील : सरकारवरील दबाव कैक पटीने वाढला

Kolhapur news
By -

 

            


      

            


मुंबई : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मुंबईत पोहोचलेत. त्यांनी येथील आझाद मैदानावरील आपल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. याठिकाणी खबरदारी म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन - तेरा वाजलेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


   दरम्यान, मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरील दबाव कैकपटीने वाढला आहे.


मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते? ते पाहा


मराठा आंदोलनामुळे मुंबईत झालेल्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करत आझाद मैदान परिसरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळवली आहे. तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.


      कोणते मार्ग बंद राहतील?


वाशीकडून फ्रीवेकडे जाणारा मार्ग. वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणारा मार्ग.छेडानगरवरून फ्री वेकडे जाणारा मार्ग.


          पर्यायी मार्ग कोणते?


वाशीहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने जाणारी वाहने छेडानगर मार्गाने मुंबईत प्रवेश करतील.छेडानगरवरून फ्रीवेकडे जाणारी वाहने अमरमहल, नेहरूनगर ब्रीजमार्गे जातील.


     ---------------------