काठमांडू : सुशीला कार्की आज रात्री नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यांच्या नावावर अंतिम एकमत झाले आहे. नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करण्यास सहमती दर्शविली आहे.
काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्या समर्थकांनी सांगितले की ,सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत.
दुसरीकडे, नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, भारतीय पत्रकारांवर हल्ला आणि गैरवर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आजही दोन भारतीय पत्रकारांसोबत गैरवर्तन करण्यात आले.
----------------