कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील उद्योजक स्व. आनंदा मांगले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित चिमगाव या त्यांच्या गावी असलेल्या आश्रम शाळेतील गरीब व अनाथ मुलांना चादर व चटई वाटप करण्यात आले.
आनंदा मांगले हे कुस्तीपटू होते तसेच बैलगाड्यांच्या शर्यतीचा सुद्धा त्यांना चंद होता.
वैयक्तिक जीवनात ते अत्यंत सहृदयी व उदार मनाचे होते.त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक गरीब मुलांना आर्थिक मदत केली.त्यांनी सुरू केलेले आनंद उपहारगृह पंचक्रोशीत महशूर आहे.
येथील मिसळ,बटाटे वडा,शिरा,उपमा यांची लज्जत कांहीं और असते अशी ग्राहक वर्गात चर्चा असते.निपाणी राधानगरी रस्त्यावरून जाणारे वाहन चालक आनंद हॉटेल भेट देऊन पुढे जातात.याचे कारण पदार्थांची गुणवत्ता हे होय.
स्वतः गरिबीतून पुढे आल्यामुळे तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.लोकनेते स्व .सदाशिवराव मंडलिक हे त्यांचे आदर्श होते.त्यांचे चिरंजीव माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे ही ते जवळचे कार्यकर्ते होते.
आश्रम शाळेतील मुलांच्या अंथरूण पांघरुणाची समस्या राहू नये म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने मुलांना चादर व चटई चे वाटप केले.ही शाळा स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी अनाथ मुलांसाठी स्थापन केली होती.
या शाळेत शुक्रवार दिनांक १२सप्टेंबर रोजी सकाळी ११वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खालील मान्यवर उपस्थित होते.
बंडा मोरबाळे,सुनील शेलार,सतीश साळोखे,सोन्या सातवेकर,गिरिबुवा कन्स्ट्रक्शन चे मालक गणेश भोसले,सम्राट मांगले,युवराज शिंदे इत्यादी.
------------------------