कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहरात गेल्या दोन तीन महिन्यापासून मोठ्या चोऱ्या होत आहेत. विशेषता:बंद घरे फोडली जात आहेत.
मुरगूड मधील नागरिकांच्या शिष्ठमंडळाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला हाेता . शहरात फिरणारे विक्रेते आणि अनोळखी फिरस्ते यांचा बंदोबस्त करावा तसेच गस्तही घालावी असे या निवेदनात म्हंटले होते. पी एस आय.शिवाजी करे यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले होते. कालच फासेपारधी लोकांचा एक तांडा मुरगूड शहरात दाखल झाला.त्याबद्दल शिवभक्तांनी पोलिस ठाण्याला कळविले
मुरगूड पोलिसांनी लगेचॲक्शन घेतली. दोन कॉन्स्टेबल फासेपारधी वस्तीवर पाठवले व ओळख पत्रांची विचारणा केली.त्या लोकांना ओळख पत्रे किंवा तत्सम कांहीं पुरावे देता आले नाहीत.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलिसांनी त्या फासेपारधी लोकांना त्यांच्या कुटुंबीया सह बस स्थानकावर आणले व एस टी बस मधून कोल्हापूरला पाठवले.सोबत दोन कॉन्स्टेबल जोडून दिले.कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करत असताना पोलिसांनी माणुसकी सुद्धा दाखविली.भटके लोक पोट भरण्यासाठी आले असले तरी शहरात घडलेले अनेक चोरीचे प्रकार पाहता विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्हणून त्या भटक्या लोकांना सहानुभूती दाखवून त्यांच्या गावी पाठविले.मुरगूड मधील शिवभक्तांचे सुद्धा त्यांना सहकार्य लाभले. कोल्हापूर न्यूज नेटवर्कने याबाबत सविस्तर वृतांत दिला होता.
-------------------------