कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काल भारत पाकिस्तान सामना दुबईत झाला.भारताने हा सामना सहज जिंकला .एरव्ही भारत पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमी मुले फटाक्यांची बंडले आधीच आणुन ठेवतात.शेवटच्या ओव्हरला विजय टप्प्यात दिसू लागताच आतषबाजीला सुरुवात होते.इतर सामन्यात असा जोष नसतो. काल मात्र मुलांनी कसलाच जल्लोष केला नाही किंवा फटाकेही फोडले नाहीत.
अनेकांनी टीव्ही वर सुद्धा बहिष्कार टाकला.भारत विजयी होऊन सुद्धा केवळ सिंदूरच्या सन्मानासाठी मुलांनी मौन पाळले.
मुरगूडला दरवर्षी क्रिकेटचे सामने भरत असतात.येथील सानिका स्पोर्ट्स या मंडळाचा अधिक पुढाकार असतो.इतरही कांहीं मंडळे सरसावतात.रात्रीच्या विद्युत झोतातही सामने होत असतात.लाखोंची बक्षिसे व चषक असतात.
क्रिकेटप्रेमी मुरगूडने काल मात्र खरंच संयम पाळला.राष्ट्र प्रथम ही भावना रुजत असल्याचे हे द्योतक आहे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.त्यांनी शाबासकीचे चार शब्द सुद्धा ऐकवले.
खेळात सुद्धा पाकिस्तानचे कंबरडे मोडले याचा आनंद लुटत असताना मुलांनी सिंदूरचाही सन्मान राखत भारतीय माता भगिनींच्या पाठीशी आपण असल्याचे त्यांनी दाखवून दिले.येथील सोशल मिडियाने सुध्दा महत्वाची भूमिका बजावली. या आदर्शाचे कौतुक सुध्दा झाले.
-----------------------

