कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या प्रायोजित कार्यक्रमांची ची अंमलबजावणी महाराष्ट्रभर सुरू आहे.प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था युद्ध पातळीवर कामाला लागलेल्या आहेत.देवेंद्र फडणवीस सरकारने घोषणा केलेल्या कार्यक्रमामध्ये स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीच्या उपक्रमास सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे .कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
शारदीय नवरात्रोत्सवात दुर्गा शक्तीला आवाहन करण्यात आले.आणि काय आश्चर्य विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिला पुढे आल्या .त्यांनी सुंदर दिमाखदार फेटे बांधून मोठी बाईक रॅली काढली.
"आम्हीं दुर्गा "या संकल्पाचा हा हुंकार होता.यामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन च्या वकील महिला,महिला पोलिस कर्मचारी,छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर व परिचारिका,शहाजी लॉ कॉलेज मधील.प्रशिक्षणार्थी महिला ,शिक्षण क्षेत्रातील शिक्षका व प्राध्यापिका इत्यादींचा समावेश होता.
प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस इत्यादींचा समावेश होता. प्रत्येक दुर्गेच्या हाती घोषणांचे फलक होते.केवळ.घोषणा देऊन त्या थांबल्या नाहीत.तर विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्व उपक्रमांची हिरीरीने सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये समाज प्रबोधनाचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. टप्पा टप्प्याने ही मोहीम पुढे सरकेल.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या दुर्गांना शासकीय उपक्रमांची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या.
----------------------



