कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होत आहे.ग्रामदेवता अंबाबाई मंदिर व्यवस्थापनाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.राणाप्रताप मंडळामार्फत दुर्गामाता दौड चे नऊ ही दिवस आयोजन केले आहे. दुर्गामाता दौड चे नागरिकांनी अत्यंत उत्साहात व भक्ती पूर्ण वातावरणात स्वागत केले.येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालया मार्फत लता बहेनजी व लक्ष्मी बहेनजी यांनी औक्षण केले .
दुर्गामातेच्या जयजयकारासह राष्ट्रीय एकात्मतेच्या,वंदे मातरम् व छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,तानाजी मालुसरे,इत्यादी नरवीरांच्या घोषणाही देण्यात आल्या.संयुक्तिक पोवाडे व गीते गायिली गेली.
माता भगिनींनी आपापल्या अंगणात व समोरील रस्त्यावर रांगोळ्या काढून ,पुष्पवृष्टी करून दुर्गा दौड चे स्वागत केले.आरत्या व कुंकुम तिलक केले.विशेष म्हणजे भर पावसात भिजत अनवाणी पायाने ही दौड निघाली होती.गावोगावी सुरू झालेल्या दुर्गा दौड ने जनमानसात भक्ती आणि राष्ट्रीय भावना जागृत होत आहे हेही नसे थोडके.
--------------------------



