उठ भारता, ऐक टापा ऐक आवाज.नरेंद्रांच्या नेतृत्वाचा जगभर डंका वाजतोय आज.

Kolhapur news
By -

    



      कोल्हापूर न्यूज  /  वि .रा. भोसले  


          भारत देशाला आज नरेंद्र मोदींच्या रूपाने न भूतो असे निस्वार्थ आणि निर्धारयुक्त नेतृत्व लाभले आहे. देशातील भ्रष्टाचाराचा राक्षस जसा  आज त्यांच्या निशाण्यावर आहे तसा देशाला विश्वगुरु बनवण्याचा निर्धार त्यांच्या भात्यात आहे. राष्ट्र सशक्त आणि सामर्थ्यशाली असेल तरच जागतिक व्यासपीठावर त्यांला सन्मानाचे स्थान मिळते.नरेंद्र मोदींनी भारत देशाला हा सन्मान मिळवून दिला आहे.कसा ते पाहूया.


       राष्ट्र प्रथम हा त्यांचा पहिला नारा आहे. "मी जे जे करतोय ते माझ्या १४० कोटी देशबांधवांसाठी",असे ते प्रत्येक व्यासपीठावरून आवर्जून सांगत असतात.माइकवरून  विकासाच्या ज्या ज्या घोषणा ते करत असतात त्या सर्व प्रत्यक्षात उतरवल्या जातात  हे त्यांच्या टीकाकारांनी सुद्धा ते मान्य केले आहे.


   भारतीय सेनेचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी कसलीही कसर बाकी ठेवली नाही.शेजारी पाकिस्तान, बांगला देश,श्रीलंका ,नेपाळ सारखे भुकेले देश आहेत.स्वतः कर्जबाजारी झाल्या मुळे चीन ,अमेरिका सारख्या बड्या राष्ट्रांच्या वळचणीला ते जाऊन बसले असले तरी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची त्यांची हिम्मत होत नाही.


   हा नवा भारत आहे हे नरेंद्र मोदींनी त्यांना ठणकावून सांगितले आहे.  नुसते सांगितले नाही उरी  आणि सिंदूर सारख्या लष्करी कारवायातून  दाखवून दिले आहे.ही झाली युद्ध सज्जता.भविष्याचा वेध घेऊन त्यांनी ट्रेन्स , महामार्ग,विमान मार्ग  यांचे जाळे देशभर पसरवले आहे.उंच भक्कम पूल बांधून पहाड,आणि पर्वतीय क्षेत्रातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणले आहे.खरं नाही वाटत ? ज्या ठिकाणी लष्करी गाड्यावरसुद्धा दगड फेकले जात होते,तिरंगा पायदळी तुडवला जात होता त्या जळत्या काश्मिरात आता चौका चौकात तिरंगा फडकताना दिसतोय. परवाचा गणेशोत्सव सुध्दा तेथे न भूतो असा दमदार झाला.  काश्मीर हे आपल्या देशाचे नंदनवन होते.अतिरक्यांनी त्याचे स्मशान करून टाकले होते.



नरेंद्र मोदी यांच्या साहसी आणि दूरगामी नेतृत्वामुळे तेथे पुन्हा नंदनवन फुलते आहे.कर्नाटकाच्या काँग्रेसी राज्यात सुध्दा परवा त्यांचा द्रष्टा नेता (visionary leader) म्हणून गौरव करण्यात आला.सर्वांचा विकास,सर्वांचा विश्वास,सर्वांची साथ असा नारा देत हा महान नेता गेली १० वर्षे या देशाचे दिमाखदार नेतृत्व करतो आहे .म्हणूनच जगभरातल्या शक्तिशाली देशात सुद्धा लाल कार्पेट वरून सन्मानाने वावरतो आहे. तुलनाच करूया म्हणजे लक्षात येईल. आयात शुल्क (Terrif) वाढवून आर्थिक युद्धाची धमकी देणाऱ्या ट्रम्फ ना मोदी डगमगले नाहीत.भीमाने जरसंधाला जसे आव्हान दिले होते तसे त्यांनी डोनाल्ड  साहेबांना दिले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्य नीति वापरून त्यांनी रशिया चीन शी हस्तांदोलन केले.ट्रम्फ शरमले आणि नरमले.

  आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस.देशातून आणि जगभरातून या दृष्ट्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत.डोनाल्ड साहेबांनी सुद्धा दिल्या. एवढे सामर्थ्य  असून सुद्धा नरेंद्र मोदी यांनी कधिच त्याचा अहंकार दाखवला नाही.उलट रशिया,युक्रेन,इस्राएल, इराण,थायलंड,इत्यादी देशांना शांततेचा संदेश दिला .त्यांच्यात मध्यस्थी केली .

   त्यामुळे सारे जग त्यांच्या कडे विश्वगुरु म्हणून पहात आहे.

   या उगवत्या विश्वगुरूने आपला सारा सन्मान मात्र १४० कोटी जनतेला अर्पण केला आहे.वयाच्या पंच्याहत्तरीत सुद्धा जनसामान्यांसाठी त्यांची  घोडदौड सुरूच आहे.म्हणून त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी, डुलकी घेत बसलेल्या भारत देशाला खांद्यावर हात टेकवून सांगावेसे वाटते.

 "उठ भारता, ऐक टापा,ऐक आवाज,नरेंद्रांच्या कीर्तीचा जगभर डंका वाजतोय आज."


  लाडक्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


 जय भारत 


      ---------------------------------