सोलापूर : जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुई येथे सुरू असलेल्या मुरूम उपसा बेकायदेशीर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरू केली होती, परंतु त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कॉल करत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर अजित पवारांवर टीकेची झोड देखील उठवण्यात आली होती.
कुई येथील मुरूम उपसावर डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी कारवाई केली होती. मात्र, अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबवावी लागली होती. परंतु, आता स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच असल्याचे म्हटले आहे. बेकायदा उत्खनन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत
--------------------

