कोल्हापूर न्यूज नेटवर्क
केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत दुर्गम ते अति दुर्गम भागात ही योजना पोहोचवण्याचे काम सुरु आहे. नानीबाई चिखली मध्ये सुद्धा ही योजना खूप दूरवर पोहचली आहे. पण अजूनही गावाच्या पश्चिमेला असलेल्या वाड्या-वस्त्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे
कौलगे रोडवर असणाऱ्या पोवार मळ्यातील ग्रामस्थ अजूनही शेतीपंपावरील पाण्यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे पाण्यासाठी करावी लागणारी वणवण काही कमी होत नाही.
म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सदर पाईपलाइन करण्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन सदर वस्त्यांवर पाणी पोहोचवण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी पोवार मळ्यातील रहिवाशांनी नानीबाई चिखली ग्रामपंचायतीकडे केली आहे .
------------------------------

