प्राथमिक शिक्षकांचे टीईटीसह प्रलंबित प्रश्न मार्गी लावू

Kolhapur news
By -

 

           

             


       

    



              


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      प्राथमिक शिक्षकांच्या टीईटीसह इतर प्रलंबित प्रश्नांच्यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या समवेत बैठक आयोजित करून  शिक्षकांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करू असे आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री  नामदार प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले. 


      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे महामंडळ अधिवेशन कोल्हापूर येथील जय पॅलेस सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना दोन्ही मंत्री महोदयांनी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांना समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. बुधवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी ही बैठक होणार आहे. 


     संभाजीराव थोरात म्हणाले, फक्त शिक्षकांनाच परीक्षा कशासाठी ? शिक्षकांना परीक्षा बंधनकारक करावयाची आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना ती बंधनकारक नाही हा अन्याय आहे, परीक्षा सर्वांच्यासाठीच बंधनकारक करा. 


   शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, टीईटी सक्तीचा आदेश हा अमानवीय आहे. शिक्षक म्हणून सेवेची २५ वर्षे दिल्यानंतर पुन्हा परीक्षा कशासाठी ? या विरोधात सुप्रीम कोर्टात लढाई करू. राज्यातील आठ लाख शिक्षकांशी निगडीत हा विषय आहे. टीईटी सक्तीच्या विरोधात आठवडाभरात याचिका दाखल करू. संच मान्यतेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत.


यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे, आबासाहेब जगताप, विलास चौगुले, बाळासाहेब झावरे, किशन हादगे, कैलास दहातोंडे, रवीकुमार पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, यांच्यासह शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     



               -----------------------