राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही जातीभेद मानला नाही , राष्ट्र निर्माण हेच उद्दिष्ट - गर्गे.

Kolhapur news
By -

 


                



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही जातीभेद मानला नाही. राष्ट्र निर्माण हेच संघाचे सदैव उद्दिष्ट राहिले आहे. असे उद्गार दत्तात्रेय गर्गे यांनी मुरगूड येथे काढले. संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या शस्त्र पूजन सोहळ्यात ते बोलत होते. 


       दसरा महोत्सवानंतर मुरगूड मंडलाने हा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे जिल्हा कार्यवाह गर्गे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे हे होते. 


      आपल्या भाषणात गर्गे यांनी संघाचा शंभर वर्षाचा इतिहास थोडक्यात सांगितला. स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी तुरुंगवास भोगला होता. फाळणी आणि नंतर पाक व्याप्त काश्मीरला त्यांनी विरोध केला होता.या देशात राहतो तो हिंदू असे मानून बॅरिस्टर झालेल्या मुस्लिमांचा सुद्धा संघाने सत्कार केला होता. महापूर, युद्धक्षेत्र,भूकंप,भूस्खलन , प्लेग कोरोना या सारख्या सेवेच्या सर्व क्षेत्रात संघ आघाडीवर होता.आतंकवाद संपवण्यासाठी आपल्या लष्कर प्रमुखांनी दिलेला इशारा पुरेसा आहे.भारत हा एकच देश हिंदूंसाठी जगात आहे हे लक्षात ठेवा असा संदेश ही त्यांनी  भारत वासियांना दिला.


छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.भारत माता की जय ,छ.शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देण्यात आल्या.




              ---------------------------