युनिक बायो फर्टीलायझर्सने दिवाळीनिमित्त कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य : आश्रमातील वृद्धांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      दिवाळीच्या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने  कोल्हापूर मधील 'मातोश्री वृद्धाश्रमा' मध्ये वृद्धांना दिवाळी भेटवस्तूंचं वाटप करण्यात आले. आश्रमातील ४० हून अधिक वृद्ध नागरिकांना  दीपावली निमित्त उपयुक्त अशा वस्तूंचे वाटप युनिक बायो फर्टीलायझर्सचे संचालक राम रानगे यांच्या हस्ते करण्यात आले.


 याप्रसंगी वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे चेहेरे हसतमुख झाले आणि त्यांना भेट दिल्यानंतर अनेकांनी भावना व्यक्त करत 'या दिवाळीने आमच्या जीवनात एक नवीन आनंद आणला आहे,' असे यावेळी बोलताना सांगितले. आश्रमाच्या कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सणाच्या उत्सवात वृद्धांना सामील करून भेटवस्तू दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .


आश्रमाचे संचालक  ॲड. शरद शिवाजी पाटोळे म्हणाले, "वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य असावं, त्यांच्या जीवनात रंग भरावे, हा आमचा उद्देश आहे. दिवाळीच्या या आनंददायी सणात राम रानगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांना एक छोटीशी भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवले आहे."


 वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या या टप्प्यातही सणाचा आनंद घेता येईल, हे पाहून त्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल, अशी भावना राम रानगे यांनी यावेळ व्यक्त केली .


यावेळी  राहुल माळी यांच्यासह आश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.


                    --------------------