नानीबाई चिखलीतील लिंगायत समाज हॉल साठी संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून दहा लाखाची मदत.

Kolhapur news
By -

 

                 


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


         नानीबाई चिखलीतील लिंगायत समाज हॉल हा अनेक ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपयोगी पडत असतो.राजेंद्र नुल्ले यांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हॉलच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे.त्यांच्या आणि समाजातील प्रमुख घटकांच्या प्रयत्नातून आज हॉल नाविन्याचा श्वास घेत आहे. याचाच भाग म्हणून माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नातून सीएसआर फंडातून या हॉल साठी दहा लाख रू.मंजूर झाले आहेत. या दातृत्वाबद्दल  संजयदादा मंडलिक यांचा समाजाच्या वतीने कृतज्ञतापर  सत्कार करण्यात आला.


यावेळी कारखान्याच्या संचालिका सौ.मंगल तुकान, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेंद्र नुल्ले,ग्रामपंचायत सदस्य  श्रीशैल नुल्ले,  प्रकाश वाडकर  तुकाराम संकपाळ विनायकराव तुकान, बाळकृष्ण डवरी,अविनाश मगदूम,  महेश संकपाळ, महेश गळतगे, अवबा वाडकर, बाळनाथ डवरी, कृष्णात मगदुम , विक्रांत गळतगे , तानाजी तुकान,  सुरेश मेथे आदी मान्यवर उपस्थित होते.


              -------------------------