कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पूरग्रस्त मराठवाड्यामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर जिल्हयाच्या वतीने दिवाळीला दीड लाखाचे जीवनावश्यक व शालेय साहित्य विद्यार्थी व पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले .
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील अनेक गावे पाण्याखाली जाऊन शेतकरी व विद्यार्थी यांची दयनीय अवस्था निर्माण झाली होती . अशा पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्यायक्ष भरत रसाळे यांनी खाजगी प्राथमिक शाळातील शिक्षकांना केले होते त्यांच्या आवाहानास तात्काळ प्रतिसाद देऊन शिक्षकांनी दीड लाखाची मदत जमा केली होती .
या दीड लाख रुपयातून .
धाराशिव जिल्ह्यातील परंडा व ढगपिंपरी , नांदेड जिल्ह्यांतील आमदरी, बीड जिल्ह्यांतील . केळगांव व सोलापूर जिल्ह्यातील माढा , टेंभूर्णी ,मांगाडीचाळ या पूरग्रस्त गावी ही मदत करण्यात आली .
बीडमध्ये विनोद घुले वैजनाथ घुले रविंद्र घुले.नांदेडमध्ये अस्मिता भिसे , संजय माजळकर , शंकर बर्डे, सोलापूर मध्ये कैलास सातपुते नारायण सूर्यवंशी मल्लाप्पा परशेट्टी , विठ्ठल होनमारे, हणमंत कांबळे धाराशिव मध्ये सुधीर खाडे , निकिता सुराणा , नरेश ठाकूर मुख्याध्यापिका शिलाताई गुंड ,राणी शिंदे या संघटनेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन या मदतीचे वाटप केले .
संघटनेचे पदाधिकारी व तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी शाळातील शिक्षकांनी केलेल्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले .
या उपक्रमाबाबत बोलताना राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले की , " खाजगी शिक्षकांच्या मध्ये मुळातच समाजभान जपण्याची वृती असल्यामुळे त्यांनी तात्काळ ही मदत जमा करून कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा मराठवाड्यात प्रसारित केला याचे समाधान वाटते . " या समाजसेवी शिक्षकांना धन्यवाद देऊन भविष्य काळातही हे शिक्षक असेच सहकार्य करतील अशी भावना व्यक्त केली .
- - - - - - -

