अखेर रो-को.जोडीने विजय खेचून आणला : ऑस्ट्रेलिया ला नऊ विकेटने हरवले.

Kolhapur news
By -

 

          


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 प्रसार माध्यमांनी रोको  (रोहित+कोहली) म्हणून अफाट प्रसिद्धी दिलेल्या  जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा वनडे सामना नऊ विकेटने भारताला जिंकून दिला आणि लाखो क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांना न्याय दिला.

     रोहितने नाबाद १२१ धावा व विराटने नाबाद ७४धावा काढून आपण अजूनही क्रिकेटचे बाहुबली आहोत हे दाखवून दिले.

  दोन सामने हरलो असलो तरी रोको हरले नाहीत हेच त्यांनी दाखवून दिले.

 समीक्षकांनी मागच्या दोन सामन्यातील पराभवाची जी कारणे दिली आहेत ती सुद्धा विचारात घ्यायला हवीत.त्यांच्या मते टॉस जिंकणे आणि प्रथम गोलंदाजी मिळणे नशिबाचे असते.फलंदाजीत पहिल्या किंवा दुसऱ्या विकेट मध्ये एकाने तरी शतक काढणे आवश्यक असते.म्हणजे पहिल्या तीन पैकी एका तरी   हुकुमी फलंदाजाने  शतकी मजल मारायला हवी. म्हणजे ओव्हरला ६च्या सरासरीने ३०० धावापर्यंत पोचता येते.

   दुर्दैवाने तसे घडू शकले नाही.दोन्ही वेळेला भिजल्या पिचवर भारताला प्रथम बॅटिंग करावी लागली.

  सिडनी च्या मैदानावर मात्र रोको चे फलंदाजीचे कौशल्य पहायला मिळाले.प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाचा मनमुराद आनंद घेतला.

  ऑस्ट्रेलियाला भारत हरवू शकतो हे रोको नी दाखवून दिले आणि दीपावली नंतरची विजयी भेट देशाला अर्पण करुन एक सुखद धक्का दिला आहे.एवढेच नव्हे तर भारतीय क्रिकेटचा दर्जा कसा उत्तम आहे हेही दाखवून दिले आहे.


                  ---------------------