महिला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय वाघिणींची फायनल पर्यंत झेप. ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने हरवले.

Kolhapur news
By -

 

            

 

           कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


      महिलांच्या  एकदिवसीय वर्ल्ड कप क्रिकेटचा सेमी फायनलचा सामना मुंबईत अत्यंत चुरशीने खेळला गेला.

   भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५ विकेट व ९ चेंडू राखून हरवले.

      ज्या साऊथ आफ्रिकेने याआधी भारताला हरवलं होतं त्या संघाबरोबर २ नोहेंबर रोजी फायनल सामना होणार आहे.

    मोठी झेप घेताना वाघ थोडा मागे सरकतो. मागील पायावर जोर देऊन तो उंच झेप घेतो.

  अगदी तशीच झेप क्रिकेट मधील आपल्या वाघिणींनी घेतली असून त्या

  त्या फायनल पर्यंत पोचल्या आहेत.

    ऑस्ट्रेलियन संघाने ३३८ धावांचा डोंगर रचून ठेवला होता.हे लक्ष गाठणे तितके सोपे नव्हते.

    स्मृती मानधना सारखी हुकुमी फलंदाज(२४) बाद झाल्यावर आशा संपल्या होत्या.

    कौर आणि जेमिमा ने किल्ला लढवला.त्या विकेटवर टिकून राहिल्यामुळे विजयाच्या आशा उंचावल्या. जेमिमा रॉड्रिक्स (१२७) आणि कौर (८९) शेवटपर्यंत नाबाद राहिल्या.भारतीय संघाच्या विजयाची शिकार याच दोन वाघिणींनी केली असे म्हणायला हरकत नाही.

   मैदानात भारतीय खेळाडू ,प्रशिक्षक आणि प्रेक्षकांनी एकमेकांना मिठ्या मारून अशक्यप्राय वाटणारा असा  विजयोत्सव साजरा केला.

   हा संघ दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा विजय मिळवणारच असा विश्वास निर्माण झाला आहे.

 हा वर्ल्ड कप जिंकला तर भारतात दिवाळी नंतरची दिवाळी साजरी व्हायला हरकत नाही.


                 -----------------