दोन भावाच्या एक पत्नीने व्यक्त केल्या भावना

Kolhapur news
By -

 

            


सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात राहणारे प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन भावांनी १३ जुलै २०२५ रोजी एकाच वधू सुनीताशी लग्न केलं. या विवाहाला “जोडीदार प्रथा” म्हणतात. हिमाचल आणि उत्तराखंडातील काही समुदायांत ही प्रथा आजही आढळते

   

    या विवाहामुळे दोन्ही भाऊ देशभरात चर्चेचे विषय बनले. मात्र, सुरुवातीला त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांनंतर कपिल नेगी परदेशात नोकरीसाठी बहरीनला रवाना झाला. त्याने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. त्यावर भाऊ प्रदीपने भावनिक पोस्ट लिहिली. “भाई, लहानपणापासून आजवरच्या सगळ्या आठवणी तुझ्याशी जोडलेल्या आहेत. तुझ्याशिवाय घर ओसाड वाटतंय. लवकर परत ये…” अशा शब्दांत त्याने आपली भावनिक भावना व्यक्त केली.

   आजवर शांत राहिलेली सुनीता हिने देखील सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिलं “नवीन गोष्टी चांगल्या वाटतात, पण जुन्या आठवणी सर्वात सुंदर असतात. मिस यू बोथ ऑफ माय पार्टनर्स अँड लव यू!” तिच्या या पोस्टनंतर या विवाहाची चर्चा पुन्हा एकदा रंगली.

   हिमाचल आणि उत्तराखंडातील काही समुदायांत ही प्रथा आजही आढळते.
यामध्ये एका कुटुंबातील सर्व भावांचं लग्नं एका मुलीशी केलं जातं, काहीवेळा एका मुलीचे पाच भावांशीही लग्न होऊ शकते. या परंपरेला “पांचली प्रथा” असंही म्हटलं जातं.
 
               ------------------